ढवळ पाटी युवक खून प्रकरणातील फरारी तीन आरोपीस पोलिस कोठडी  डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी!

ढवळ पाटी युवक खून प्रकरणातील फरारी तीन आरोपीस पोलिस कोठडी

डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10/04/2026 रोजी रात्री 01.20 वा. चे सुमारास ढवळपाटी, वाखरी, ता. फलटण, जि. सातारा येथील मि-याचीवाडी कमानीजवळ संदीप उमाजी जाधव, रा. मि-याचीवाडी (दालवडी), ता. फलटण, जि. सातारा यांचा मुलगा सोमनाथ संदीप जाधव वय 18 वर्ष याचा 1. आदित्य विजय शिंदे 2. चिक्या लोखंडे 3. पिंट्या लोखंडे 4. ओम लोखंडे सर्व रा. ढवळ, ता. फलटण, जि. सातारा यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन व उचलुन आपटुन खुन केल्याबाबतची तक्रार संदीप उमाजी जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 190/2026, भा. न्या. सं. 2023 चे कलम 103(1), 3(5) अन्वये दि. 10/04/2026 रोजी गुन्हा नोंद झाला आहे. फिर्यादीमध्ये खुनाचे कारण मयत सोमनाथ संदीप जाधव हा एका अल्पवयीन मुलीशी मोबाईल फोनद्वारे सोशल मिडियाच्या माध्यमातून चॅटींग करीत असल्याच्या रागातून झाल्याचे नमुद आहे.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच परागंदा झालेले संशयित आरोपी 1. आदित्य विजय शिंदे, वय – 23 2. तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे वय 24 वर्ष 3. प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे वय 22 वर्ष सर्व रा. ढवळ, ता. फलटण यांच्या ठावठिकाण्याची माहिती घेऊन त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

संशयित आरोपी 1. आदित्य विजय शिंदे, वय 23 वर्ष, रा. ढवळ, ता. फलटण यास दि. 11/04/2026 रोजी अटक करण्यात आली असुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि. 16/04/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. 2. तेजस उर्फ चिक्या शिवाजी लोखंडे वय 24 वर्ष 3. प्रद्युम्न उर्फ पिंट्या पांडुरंग लोखंडे वय – 22 वर्ष दोघे रा. ढवळ, ता. फलटण यांना दि. 13/04/2026 रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांना आज दि. 14/04/2026 रोजी मा. न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, तुषार नलवडे, हणमंत दडस व शिवराज जाधव यांनी सहभाग घेतला होता.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!