फलटण तालुक्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न सुरक्षा विभागाची मोठी कामगिरी!
1 लाख 35 हजाराच्या अवैध गुटखा साठ्यासह एकाला अटक! अवैद्य गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले!
फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी श्रीमती.भाग्यश्री दत्तात्रय राजोळे, अन्न सुरक्षा अधिकारी, सातारा यांचे फिर्यादि जबाबा वरून,
आज समक्ष फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण, तालुका- फलटण, जिल्हा सातारा येथे येऊन लेखी प्रथम खबरी अहवाल देते की, मी दिनांक. 23/09/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पंच साक्षीदार यांचेसमवेत गुप्त माहितीच्या मे. सतीश संभाजीराव निंबाळकर, यांचे राहते घर, गावाच्या कमानीच्या उजव्या बाजूला, मु. पो. वाठार निंबाळकर ता. फलटण, जि-सातारा या ठिकाणी हजर झाले. मी सदर ठिकाणी हजर व्यक्तीस त्यांचे स्वतःचे शासकीय ओळखपत्र दाखवून त्यांचा तसेच पंचसाक्षीदार यांचा तसेच सोबत असलेले श्री.तु.ना.शिंगाडे, पदावधीत अधिकारी व श्री आय.एस. हवालदार, अन्न सुरक्षा अधिकारी यांचाही परिचय दिला व भेटीचा उद्देश सांगून त्यांनी सदर ठिकाणी प्रवेश केला. त्यानंतर हजर व्यक्तीस त्यांचा परिचय विचारला असता त्यांनी त्यांचे नाव श्री. सतीश संभाजीराव निंबाळकर सांगून स्वतः विक्रेता व मालक असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी तपासणी केली असता सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला, सुगंधित तंबाखु, मावा हे अन्नपदार्थ विक्रीसाठी साठा केले असल्याचे दिसून आले. मी सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या
पिशवी/पाऊच/बॉक्स फोडून, उघडून व हुंगून बघितले असता त्यामध्ये पानमसाला. सुगंधित तंबाखु मावा हे आढळून आले. मी सदर नमूद प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या साठ्यामधून प्रत्येकी । पुडा / बॉक्स प्रातिनिधिक नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित साठा हा मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने जनआरोग्याच्या हिताच्या दृष्टीने पुनर्विक्री-पुनर्वापर होऊ नये म्हणून स्वतःच्या ताब्यात घेतला त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
(प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त साठा व उत्पादक बाबत माहिती)
विमल पान मसाला व इतर प्रतिबंधित पान मसाला
सदर संपूर्ण प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा हा कोणी पुरवठा केला याबाबत विचारणा केली तसेच सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ कोणाकडून खरेदी केला याबाबत विचारणा केली असता त्याने सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ कोणाकडून खरेदी केले त्या पुरवठादाराबाबत कोणतीही माहिती दिली नाही. प्रतिबंधित अन्नपदार्थाबाबत कोणतेही खरेदी बिल सादर केले नाही.
त्यानंतर मी सदर ठिकाणी आढळून आलेला संपूर्ण साठा किमत रु. १,३५,२६०/- स्वतःच्या ताब्यात घेतला आहे तसेच सदर साठ्याचा विक्रेता व मालक श्री सतीश सांभाजीराव निंबाळकर, यांना प्रथम खबरी अहवालासोबत आपणाकडे सुपूर्त करीत आहे. सदर प्रकरणी गुन्ह्याची सखोल चौकशी होणेस विनंती आहे
सदर अन्नपदार्थ आरोग्यास हानिकारक असून त्याचे सेवनाने जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे कॅन्सर सारखे असाध्य रोग होत आहेत म्हणून सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठा व विक्री केल्यामुळे श्री. सतीश संभाजीराव निंबाळकर वय 50 वर्ष, रा. मु. पो. वाठार निंबाळकर ता. फलटण, जि सातारा यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमने तसेच भारतीय न्याय संहितेचा भंग केला आहे. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी उत्पादकापर्यंत सखोल तपास होणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे श्री. सतीश संभाजीराव निंबाळकर वय 50 वर्ष, रा. मु.पो. वाठार निंबाळकर ता. फलटण, जि सातारा यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (i), 26(2) (iv), सहृवाचन 27(3)
(e), कलम 3(i) (zz) (v) व कलम 30(2) (अ) अन्वये अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य शासन राजपत्र अधिसूचना क्र असुमाअ/अधिसूचना/866/2026/07 दि 13/07/2026चे उल्लंघन केल्यामुळे कलम 59 नुसार शिक्षेस पात्र आहे. तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 123. कलम 223 कलम 274 सहवाचन कलम 275 चे उल्लंघन केले असल्याने माझी त्यांचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थाचा राज्यात होणारा चोरटा व्यापार थांबविण्याच्या उद्देशाने तसेच याबाबतची संपूर्ण चौकशी होणेकामी सदर गुन्ह्यामधील नमूद प्रतिबंधित अन्नपदार्थाचे पुरवठादार, वाहतूकदार व वर नमूद उत्पादक यांचेपर्यंत सखोल तपास चौकशी होणेस विनंती आहे.
आरोपीस अटक केली असून
पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार करीत आहेत.









