राजाळे गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचा वाढदिवस उद्या विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार!
फलटण: राजाळे गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचा 68 वा वाढदिवस सोमवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2026 रोजी साजरा होत आहे.

सोमवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2026 रोजी सकाळी 7 ते 8 वाजता जानाई मंदिर देवीला अभिषेक व चोळीपातळ
सकाळी 9 ते 11 वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम,
सकाळी 11 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे मोफत डोळे तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आहे.
दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद शाळा व राजाळे गावातील सर्व अंगणवाडी येथे खाऊ वाटप होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता राजाळे गावातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपचा कार्यक्रम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात होणार आहे.

सायंकाळी सहा ते नऊ राजाळे येथील राहत्या घरी श्री विश्वासराव भोसले मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारतील.









