टाकळवाडे येथे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांवरून टोळी मालकास बेदम मारहाण!
5 लोकांवर गुन्हा दाखल!
फलटण: सौ. अलका सोपान मिंड व्यवसाय शेती रा. टाकळवाडे ता. फलटण यांचे फिर्यादी जबाबावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,
गुरूवार दि.०१/१०/२०२६ रोजी सायंकाळी ०७:०० वा ये सुमारास मी व माझे पती सोपान रंगराव मिड आमचे घरासमोर बसलो होतो. त्यावेळी आमचे गावातील केशव शिवाजी ईवरे हरिभाऊ केरबा इवरे हे दोघे त्यांचे शेतात उभे राहुण केशव हे शिव्या देत होते. म्हणुन आम्ही दोघे तेथे गेलो व त्यांना आम्ही म्हणालो की, आपण शिव्या का देत आहात त्यावर ते म्हणाले की, तुमचेत आलेले नगरी आमचे शेतात संडास करतात त्यांना सांगा त्यावर माझे पती सोपान यांनी आमचेकडे आलेल्या नगऱ्यांना तुम्ही त्यांचे शेतात संडासला जात जाऊ नका असे सांगितले. त्याचवेळी केशव इवरे यांनी माझे पती सोपान यांना शिवीगाळ करणेस सुरुवात केली त्यावेळी मी हरिभाऊ इवरे यांना समजावुन सांगत होते की, एकमेकांना शिवीगाळ करु नका त्यावेळी केशव ईवरे हे हरिभाऊ ईवरे यांना म्हणाले की, मी दहा मिनीटात माघारी आलो तु ईथेच थांब असे म्हणुन केशव ईवरे तेथुन त्यांचे मोटर सायकल घेवुन निघुन गेले त्यानंतर पुन्हा काहीवेळात केशव इवरे हे त्यांचे मोटर सायकलवर त्याचा मेव्हणा अविनाश संपत मिंड, मामा संपत साहेबराव मिंड यांना घेवुन आला त्यावेळी अविनाश याला मी त्यांना समजावुन सांग असे म्हणत होते. त्यावेळी अविनाश याने माझे पती सोपान यांचे गचुरे धरुन त्यांना खाली पाडले व त्यांना छातीत बुक्यांनी मारहाण केली त्यावेळी तेथे गाडीवर केशव ईवरे याचा भाऊ शितल शिवाजी इवरे व आइ लळुबाई शिवाजी इवरे हे आले व शितल याने हातात दगड घेवुन माझे पती सोपान यांचे डाये डोळयावर मारले त्यामुळे माझे पती सोपान यांचे डावे डोळयाला दुखापत झाली. त्यावेळी संपत साहेबराव मिंड यांनी पती सोपान यांना हाताने मारहाण केली तेथे संदेश केशव इवरे हा आला व त्याने लाथेने माझे पती सोपान यांना मारहाण केली. केशव शिवाजी इवरे, अविनाश संपत मिंड, संपत साहेबराव मिंड, शितल शिवाजी इवरे, संदेश केशव इवरे यांनी माझे पती सोपान यांना शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे माझा नातु शौर्य नानासो मिंड व नात सिध्दी नानासाहेब मिंड हे आले असता त्यांनाही नमुद लोकांनी मारहाण केली आहे. त्यानंतर काहीवेळात माझा मुलगा नानासाहेब सोपान मिंड हा तेथे आला तो पती सोपान यांना फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत घेवुन आला असता पोलीसांनी पती सोपान यांना वैद्यकीय उपचाराची यादि दिली ती घेवुन आम्ही उपजिल्हा रुग्नालय फलटण येथे गेलो तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करुन पुढील उपचाराकरीता रेफर केले त्यानंतर आम्ही पती सोपान यांना सुविधा मल्टीपेशालीटी हॉस्पीटल फलटण येथे घेवुन आलो व तेथे पती सोपान रंगराव मिंड यांना ॲडमीट केले आहे. सध्या त्यांचेवर उपचार चालु आहेत.
तरी दि.०१/१०/२०२६ रोजी सायंकाळी ०७:०० वा चे सुमारास मौजे टाकळवाडे ता फलटण गावचे हद्यीत टाकळवाडे ते फुलेवस्ती जाणारे रोडवर तुमचेत आलेले नगरी आमचे शेतात संडास करतात त्यांना सांगा या कारणावरुन केशव शिवाजी इवरे यांनी पती सोपान रंगराव मिंड यांना शिवीगाळ २)अविनाश संपत मिंड, ३) संपत साहेबराव मिंड हे त्यावेळी अ.नं.२ यांनी पती सोपान यांचे गचुरे धरुन त्यांना खाली पाडुन त्यांचे छातीत बुक्यांनी मारहाण केली त्यावेळी शितल शिवाजी इवरे याने दगडाने पती सोपान यांचे डावे डोळयावर मारुन त्यांचे डावे डोळयाला दुखापत केली त्यावेळी नं.२ यांनी पती सोपान यांना हाताने मारहाण केली ५) संदेश केशव इवरे याने लाथेने माझे पती सोपान यांना मारहाण . अ.नं.१ ते ५ यांनी माझे पती सोपान यांना शिवीगाळ केली त्यावेळी तेथे माझी नातु शौर्य नानासो मिंड व नात सिध्दी हे आले असता त्यांनाही नमुद लोकांनी मारहाण केली आहे. म्हणुन माझी अ.नं.१ ते ५ यांचेविरुध्द तक्रार आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस सागर अभंग करीत आहेत.









