राजाळे गावचे सुपुत्र,माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
68 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप कार्यक्रम ठरला दिशादर्शक!पालकांकडून दानशूर व्यक्तिमत्व भोसले साहेबांचे आभार!
फलटण: राजाळे तालुका फलटण गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी श्री.विश्वासराव भोसले साहेब यांचा वाढदिवस ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी भोसले साहेबांच्याकडून जानाई मातेचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर भव्य असे रक्तदान शिबिर झाले यामध्ये 68 लोकांनी रक्तदान केले. तसेच नेत्र तपासणी शिबिर झाले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून भोसले साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी आमदार सचिन पाटील, फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक राहुल निंबाळकर, नगरसेवक संदीप चोरमले, उद्योजक प्रमोदअण्णा निंबाळकर ,माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन ननवरे, गोखळी गावचे सरपंच मनोज गावडे, पै.बजरंग गावडे, यांच्यासह गावचे आजी माजी सरपंच सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, राजाळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या हस्ते भोसले साहेबांना शुभेच्छा देण्यात आला व गावातील 68 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटण्यात आल्या. या उपक्रमाबद्दल पालकांकडून दानशूर व्यक्तिमत्व विश्वासराव भोसले साहेब यांचे आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे. सायकल वाटप उपक्रम हा संपूर्ण तालुक्यासाठी दिशादर्शक ठरलेला आहे.









