मी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्याच्या प्रश्न विधानसभेत मांडल्यामुळे शासनाने पाणंद रस्ते खुले करण्याची योजना महाराष्ट्रात राबवली.- आमदार सचिन पाटील
फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
फलटण: आज तालुकास्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र.१ सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले तालुक्यातील जनतेच्या सहकार्यामुळे मी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहे आणी याच माध्यमातून लोकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभत असून जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळेच मी शासनाच्या विविध योजना आपल्या दारी आणू शकलो. नागरिकांनी शासनाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा तसेच शासन दरबारी असलेली प्रलंबित कामे या अभियानाच्या माध्यमातून करून घ्यावीत तसेच अधिकारी वर्गाने देखील नागरिकांना सहकार्य करावे. यावेळी शासनच्या विविध योजनाच्या लाभार्थ्याना अनुदान, दाखले तसेच कृषी अवजारे आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती कु.शिवांजली भोसले, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे,पोलीस उपनिरीक्षक घोरपडे मॅडम , वन अधिकारी निकिता बोटकर मैडम, पशू वैद्यकीय अधिकारी फाळके,भूमी अभिलेखचे पिसे, दुय्यम निबंधक पठाण, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.









