ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फलटण येथील सराफ व्यवसायिकाची ४२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक सुशिक्षित लोकांनी अशा आमिषांना बळी पडू नये – घनशाम बल्लाळ, पोलिस निरीक्षक


ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फलटण येथील सराफ व्यवसायिकाची ४२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक

 

 

सुशिक्षित लोकांनी अशा आमिषांना बळी पडू नये – घनशाम बल्लाळ, पोलिस निरीक्षक

 

फलटण: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ४२ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फलटण शहर पोलीस ठाणे येथे फिर्यादी अर्थ मनीष गांधी (वय 25 वर्षे, व्यवसाय – ज्वेलर्स, रा. रविवार पेठ, फलटण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 261/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम 317(4), 319(2), 336(3), 340(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील कलम 43(अ), 66(सी) व 66(डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

फिर्यादी हे फलटण शहरातील व्यावसायिक असून, आरोपींनी फोनद्वारे संपर्क साधून स्वतःला शेअर मार्केट ट्रेडिंगमधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले. त्यानंतर एम.टी.एफ. (MTF) आणि शेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.

 

विश्वास बसल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला विविध ट्रेडिंग अकाउंट व बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी एकूण ४२ लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. सुरुवातीला मोठ्या नफ्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी विविध कारणे सांगून टाळाटाळ केली. तसेच आणखी रक्कम भरण्याची मागणी केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

 

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाणे करीत आहे.

 

नागरिकांना आवाहन-  ऑनलाइन शेअर मार्केट ट्रेडिंग, गुंतवणूक किंवा कमी वेळात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. कोणतीही ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

32
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

फलटण तालुक्यातील चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कारखाने सुरू होऊ न देण्याचा इशारा! “मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रु प्रतिटन  मिळाल्याशिवाय चालू सिझन सुरू होऊ देणार नाही” – जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाअध्यक्ष नितीन यादव यांचा इशारा

error: Content is protected !!