गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच उमेद फाउंडेशनची स्थापना : श्री.धीरज अभंग, अवर सचिव, मंत्रालय महाराष्ट्र राज्य 


गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच उमेद फाउंडेशनची स्थापना : धीरज अभंग,  अवर सचिव, मंत्रालय महाराष्ट्र राज्य

विडणी : गावातील हुशार, उच्चशिक्षित, स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या हेतूनेच उमेद फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली असून यशस्वी- अयशस्वीतांनाही सामाजिक, मानसिक पाठबळ, मार्गदर्शन देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच ‘उमेद’ कार्यरत राहणार आहे अशी ग्वाही उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अव्वर सचिव , उमेद संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक धीरज अभंग यांनी दिली.

विडणी येथील कै. कृष्णराव केदारी अभंग उर्फ गांधी आण्णा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची ७ वी वार्षिक सभा व उमेद फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी फलटणचे नगर परिषदेचे माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, विडणी गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, ज्येष्ठ नेते काकासो नाळे, दत्तात्रय शिंदे , सर्जेराव आदलिंगे , शरद कोल्हे, माऊली नाळे, पतसंस्थेचे चेअरमन संतोष अभंग, व्हा. चेअरमन मंगेश शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

धीरज अभंग म्हणाले, आज विडणी गावामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र सर्व सोयी सुविधायुक्त स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी यशस्वीपणे उज्ज्वल यश मिळवत आहेत. गावातील हुशार उच्चशिक्षित आर्थिक दृष्ट्या गरजूंना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षांसाठी आर्थिक मदत व्हावी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये अपयशी, अयशस्वीतांनाही त्यांचे स्वप्न, ध्येय पुन्हा निश्चित करण्यासाठी सामाजिक , मानसिक पाठबळ, स्वतः च्या सक्षमतेसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सर्व सहकाऱ्यांच्या विचाराने ही उमेद चळवळ उभी राहिली आहे . दूरदृष्टीचा विचार करता गावातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उमेदसाठी आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला असून उमेद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. भविष्यात उमेदच्या माध्यमातून यशस्वीतांनीही पुढे येऊन योगदान द्यावे. आगामी काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन व इतर अनेक संकल्पना, उपक्रम आहेत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरम्यान आमचे आजोबा कै. कृष्णाराव केदारी अभंग उर्फ गांधी आण्णा यांच्या आदर्श विचाराने आमची वाटचाल सुरू आहे. पूर्वी गावामध्ये खाजगी सावकारीमुळे विदारक चित्र होते. हे चित्र बदलण्यासाठीच आण्णांच्या नावाने पतसंस्थेची स्थापना केली. गावातील कर्जदारांचे खाजगी सावकारी बाबत प्रबोधन केले. त्यांना परावृत्त केले , त्यांना दिशा दाखविली. आज गावाची परिस्थिती बदलली आहे . आज अनेक युवक स्वतःच्या पायावर उभे असून अधिकाऱ्यांचा गाव म्हणून विडणी गावाची ओळख झाली आहे .

मिलिंद नेवसे म्हणाले, विडणी गावातील युवकांनी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन विविध पदावर यश मिळवले आहे. गावातील अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थी यशस्वी होत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना योग्य वेळी आर्थिक पाठबळ लाभावे म्हणून धीरज अभंग यांनी व त्यांच्या सहकारी टीमने उमेद फाउंडेशन ची स्थापना केली हे निश्चितच कौतुकास्पद आहे . गरजू विद्यार्थ्यांनी निश्चितच या अभ्यासिकांचा व उमेदचा लाभ घेऊन भविष्यात यश मिळवावे व पुढे या उमेदचे आधारस्तंभ व्हावे असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या .

उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष कुंदन शेंडे म्हणाले, शिक्षण घेत असताना ऐनवेळी आर्थिकदृष्ट्या गरजूंना मदतीची गरज असते यावेळी आधारस्तंभ म्हणूनच उमेद फाउंडेशन ची स्थापना झाली . उमेद म्हणजे आशा, विश्वास, शाश्वत विकास म्हणून गरजवंतांचीही काही स्वप्न असतात म्हणून त्यांना पाठबळ देणे, प्रोत्साहन देणे या हेतूने एखाद्या कुटुंबातील हुशार विद्यार्थी – विद्यार्थिनींना त्यांच्या आर्थिक कारणांमुळे आपली स्वप्न सोडावी लागू नये हा या उपक्रमामागचा हेतू आहे .

यावेळी किसन टिळेकर ,अमोल अभंग, कृष्णा शेंडे सर यांनी मनोगते व्यक्त केली. पतसंस्थेचे अहवाल वाचन टी.डी. काळुखे यांनी केले .

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व उमेद फाउंडेशनच्या उद्घाटनाने करण्यात आली. यावेळी उमेदच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. तसेच विविध स्पर्धा परीक्षांद्वारे उत्तीर्ण झालेल्या यशस्वीतांचा गौरव करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन अभंग यांनी केले. प्रास्तविक माऊली नाळे यांनी केले. स्वागत उमेदचे उपाध्यक्ष योगेश इंगळे, सचिव अक्षय अभंग यांनी केले. तर आभार शरद कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक, सभासद , उमेदचे पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!