राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे येथे ‘सोशल मीडिया प्रबोधन शिबिर’ मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे: बदलत्या काळाची गरज ओळखून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक 26आणि 27 सप्टेंबर रोजी वार शनिवार, रविवार दिवशी पुण्यातील नऱ्हे याठिकाणी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ‘सोशल मीडिया प्रबोधन शिबिर’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी ची विशेष मीटिंग संपन्न झाली. यानंतर पक्षाच्या हिताचा सुनियोजित कार्यक्रम विविध मान्यवरांच्या सोशल मीडियातील प्रबोधनपर मार्गदर्शनातून पार पडला.
पहिल्या दिवशी मा. राजू शेट्टी, आशिष जाधव, डॉ. योगेश बोराटे आणि अण्णासाहेब चवरे,
दुसऱ्या दिवशी मा.अश्विनी सातव डोके व ॲड.राजेंद्र गलांडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना डिजिटल क्रांती आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी राज्यभरातून दोनशे कार्यकर्ते यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप माजी मंत्री श्री महादेव जानकर साहेब यांच्या पक्षाच्या आगामी वाटचाली विषयी केलेल्या मार्गदर्शन भाषणाने झाला. या कार्यक्रमासाठी जाधवर ग्रुपचे शार्दुल जाधवर, सुधाकर राव जाधवर मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य, प्रदेश अध्यक्ष श्री. काशिनाथ शेवते, महासचिव श्री. ज्ञानेश्वर सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद ओंबासे , ज्येष्ठ पत्रकार श्री स्वरूप जानकर आदी मान्यवरांनी केले.









