25 सप्टेंबर 2026 पासून फलटण तालुक्यात खत विक्रीमध्ये मोठा बदल! गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे;  खतांचा काळाबाजार, साठेबाजीवर  नियंत्रण येणार; शेतकऱ्यांनी घरबसल्या खताची बुकिंग करावी;सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण

25 सप्टेंबर 2026 पासून फलटण तालुक्यात खत विक्रीमध्ये मोठा बदल! गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे;

खतांचा काळाबाजार, साठेबाजीवर  नियंत्रण येणार; शेतकऱ्यांनी घरबसल्या खताची बुकिंग करावी;सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण

फलटण: तालुक्यात खतांची विक्री अधिक पारदर्शक व मागणीनुसार करण्यासाठी 25 सप्टेंबर 2026 पासून फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS) ही नवीन खत विक्री प्रणाली लागू करण्यात येणार आहे . या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानात रांगा लावण्याची गरज नाही. मोबाईल वरून घर बसल्या आवश्यक खताचे बुकिंग करता येणार आहे.

खतांचा काळाबाजार, साठेबाजी यावर उपाययोजना म्हणून शासनाने एफ एफ एस प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे खतांचा काळाबाजार, अनधिकृत साठेबाजी, बनावट खत विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. खताची मागणी उपलब्धता आणि विक्री व्यवहाराची डिजिटल नोंद राहणार असल्याने प्रशासनाला ही प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.

*एफ एफ एस चे फायदे*

1) घरबसल्या खत उपलब्धतेची माहिती

2) मोबाईल वरून खताची बुकिंग

3) रांग व अनावश्यक गर्दी कमी

4) खतांचा काळाबाजार व साठेबाजी वर नियंत्रण

5) बनावट खत विक्री वर नियंत्रण

*असे करा खत बुकिंग*

या प्रणालीद्वारे खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथमतः गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे लागेल. आधार किंवा फार्मर आयडी आधारे लॉगिन केल्यानंतर नोंदणीकृत शेत जमिनीची माहिती दिसेल. संबंधित सर्वे क्रमांक व जमीन निवडून पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवावे लागेल. त्यानंतर खत उपलब्ध असलेल्या अधिकृत विक्रेत्यांची यादी मोबाईलवर दिसेल. त्यापैकी सोयीच्या विक्रेत्याची निवड केल्यानंतर क्यूआर कोड तयार होईल. हा कोड विक्रेत्याला दाखवल्यानंतर त्याचे स्कॅनिंग करून नियमानुसार खताची विक्री केली जाईल. मोबाईलवर तयार झालेला क्यूआर कोड 72 तासांसाठी वैध राहणार आहे. त्यानंतर तो कालबाह्य झाल्यास आवश्यकतेनुसार पुन्हा बुकिंग करावे लागेल.25 सप्टेंबर 2026 पासून सर्व शेतकऱ्यांनी एफ एफ एस प्रणालीचा वापर करूनच खत खरेदी करावी. अनधिकृत खत विक्रेते किंवा व्यक्ती यांच्याकडून शेतकऱ्यांनी खत खरेदी करू नये. शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये एफ एफ एस ॲप डाऊनलोड करून आवश्यक माहिती अद्ययावत भरून ठेवावी. काही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण यांनी केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल! अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून मा.आमदार दीपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज 

25 सप्टेंबर 2026 पासून फलटण तालुक्यात खत विक्रीमध्ये मोठा बदल! गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे;  खतांचा काळाबाजार, साठेबाजीवर  नियंत्रण येणार; शेतकऱ्यांनी घरबसल्या खताची बुकिंग करावी;सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल! अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून मा.आमदार दीपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज 

25 सप्टेंबर 2026 पासून फलटण तालुक्यात खत विक्रीमध्ये मोठा बदल! गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे;  खतांचा काळाबाजार, साठेबाजीवर  नियंत्रण येणार; शेतकऱ्यांनी घरबसल्या खताची बुकिंग करावी;सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल! अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून मा.आमदार दीपक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज 

25 सप्टेंबर 2026 पासून फलटण तालुक्यात खत विक्रीमध्ये मोठा बदल! गुगल प्ले वरून Framework for Fertilizer Sale (FFS) अँप डाउनलोड करावे;  खतांचा काळाबाजार, साठेबाजीवर  नियंत्रण येणार; शेतकऱ्यांनी घरबसल्या खताची बुकिंग करावी;सोनाली सुतार, कृषि अधिकारी (गुण नियंत्रण ) तालुका कृषी अधिकारी कार्यालय फलटण

error: Content is protected !!