विंचुर्णी येथील बाळोबा देवाची यात्रा उद्या मंगळवार दिनांक 7 जुलै पासून सुरू
यात्रेचा मुख्य दिवस बुधवार 8 जुलै रोजी
फलटण: विंचुर्णी ता.फलटण येथील श्री बाळोबा देवस्थान यात्रा मंगळवार दिनांक 7 जुलै पासून सुरू होत आहे.मंगळवारी सकाळी सात वाजता कृष्णा नदीच्या आणलेल्या गंगेचे पूजन, सकाळी नऊ वाजता बाळोबा देवाचे विंचुर्णी गावात आगमन, दुपारी दोन वाजता हळदी समारंभ, रात्री आठ ते नऊ धूप आरती व देवाचा गोंधळ होईल.
बुधवार दिनांक आठ जुलै रोजी मुख्य दिवस असून दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी देवाचे खेळणे कार्यक्रम होईल.
अशी माहिती आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यात्रेला भाविक भक्तांनी उपस्थित राहावे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
Views: 21









