राजाळे गावच्या विकासासाठी 2 कोटी 50 लाख रु.निधी मंजूर
मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार – मा.सनदी अधिकारी विश्वासराव भोसले
फलटण: मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून राजाळे गावच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये कामे मंजूर झाली आहेत.
यामध्ये जानुबाई मंदिरासमोरील असणारी चढण काढणे व रस्ता दुरुस्ती, ओढ्याच्या पुरासाठी संरक्षक भिंती, मंदिर परिसर सुशोभीकरण यासाठी 2 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.तसेच बौद्ध नगर येथे रस्त्यासाठी 50 लाख रु निधी मंजूर झाला आहे. गावाला एकूण 2 कोटी 50 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
यापूर्वी ही जानाई हायस्कूल येथील चढण काढल्यामुळे अनेक ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
हा निधी मंजूर झाल्याबद्दल मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे राजाळे गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी आभार मानले आहेत.









