फलटण बस स्थानकातून पुन्हा गाडी चोरीला! बसस्थानक बनले आहे चोरांच्या हक्काचे चोरीचे माहेरघर? चोर पोलिस भाग -2


फलटण बस स्थानकातून पुन्हा गाडी चोरीला!

बसस्थानक बनले आहे चोरांच्या हक्काचे चोरीचे माहेरघर?

चोर पोलिस भाग -2

 

फलटण शहर: फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून व दिलेल्या फिर्यादीवरून मी भिमराव नामदेव खलाटे, वय 68 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. कांबळेश्वर बारववस्ती, ता. बारामती, जि.पुणे, समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन सांगतो खबरी जबाब की,

 

 

मी वरील ठिकाणी राहणेस असुन माझ्या घरात मी माझी पत्नी सौ. मालती व मुलगा अमित असे आम्ही एकत्रात राहणेस आहे. मी सहकारी सोसायटीमध्ये सचिव म्हणून कामास होतो त्यामुळे मला कामावरती येणे जाणेसाठी मी सन 2008 साली माझे नावावरती हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH 42J 2025 ही घेतली होती. आता मी सेवानिवृत्त झालो असुन सदर गाडी मी माझे वैयक्तीक कामाकरीता वापरत असतो.

 

दिनांक 29/05/2026 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास मी माझी हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH 42J2025 ही एस.टी. स्टॅन्ड फलटण समोरील पद्ममावती मोबाईल शॉपचे समोर लावुन मी व माझी पत्नी मालती असे आम्ही दोघे एस.टी. बसने माझी मुलगी प्रीती हीचे घरी वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर येथे गेलो. त्यानंतर सायंकाळी 6.45 वा. चे सुमारास आम्ही परत माघारी आलो व गाडी लावले ठिकाणी गेलो असता मला त्याठिकाणी माझी मोटार सायकल मिळुन आली नाही. म्हणुन मी माझ्या गाडीचा आज रोजी पर्यंत फलटण शहर तसेच आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला असता मला माझी गाडी कोठेही मिळुन आली नाही. म्हणून माझी खात्री झाली की, मी एस.टी. स्टॅन्ड फलटण समोरील पद्मावती मोबाईल शॉपचे समोर लावलेली माझी मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमती शिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेली आहे. माझे चोरीस गेले मोटार सायकलचे वर्णन खालीलप्रमाणे

 

1) 8,000/- रुपये किंमतीची काळ्या रंगाची एक हीरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल क्रमांक MH 42 J 2025 तिचा चेसीस नं. MBLHA10EE89A26136, व तिचा इंजिन नं HA10EA89A45570 असा असलेली जु.वा. किं.अं.

 

8,000/- रु.

 

तरी दिनांक 29/05/2026 रोजी सकाळी 10.00 वा. चे ते सायंकाळी 6.45 वा. चे दरम्यान एस.टी. स्टॅन्ड फलटण, ता. फलटण, जि. सातारा समोरील पद्मावती मोबाईल शॉप समोर लावलेली माझी वरील वर्णनाची अंदाजे 8000/- रु. किंमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.

 

अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार पूनम बोबडे करीत आहेत.


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!