साठे फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धाड! फलटण ग्रामीण पोलिसांचे पूर्व भागात अवैध दारू विक्रेते रडारवर, कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत 


साठे फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धाड!

फलटण ग्रामीण पोलिसांचे पूर्व भागात अवैध दारू विक्रेते रडारवर, कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ११/०४/२०२६ रोजी सायंकाळी ०५.३० वा. मी तसेच, पोलीस हवा. २००६ ओंबासे, पोलीस हवा. १८३ चांगण असे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे अंकीत बरड दुरक्षेत्र येथे हजर असताना मा. सहा. पोलीस निरीक्षक सुबानावळ यांना त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, मौजे साठेफाटा ता. फलटण गावचे हद्दीत सुर्याजी मधुकर माने रा. साठेफाटा ता. फलटण हा फलटण ते आसू रोडवर एका झाडाचे आडोशाला उघडयावर देशी दारुची बेकायदा, बिगर परवाना चोरटी विक्री करीत आहे. तरी सदर ठिकाणी छापा घाला असा मा. सहा. पोलीस निरीक्षक सुबानावळ यांनी तोंडी आदेश दिल्याने पोलीस हवा. २००६ ओंबासे यांनी लागलीच दोन पंचांना सदर ठिकाणी बोलावून घेवून मिळाले बातमीचा आशय समजावून सांगितल्यावर पंच पंचनामा करण्यास स्वखुशीने तयार झाल्यावर मी तसेच पोलीस हवा. ओंबासे, पोलीस हवा. चांगण व दोन पंच व रेडसाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, प्रिन्टर, बॅटरी सोबत घेवून खाजगी गाडीने रवाना होवून साठेफाटा येथे मिळाले बातमीचे अलीकडे आमची गाडी उभी करून पायी चालत जावून अचानकपणे १८.०० वा. चे सुमारास छापा टाकला असता तेथे एक इसम आपले पुढयात एक पांढरे रंगाचे पिशवी घेवून बसलेला दिसला त्यावेळी आम्हां पोलीस व पंचाना पाहून पळू लागला त्यावेळी त्यास आम्ही तुला ओळखले आहे तू पळू नको असे म्हणालो तरी तो पळून जात असताना सदरचा इसम यास रेड पार्टीचे र्लोकानी त्यास जागीच पकडून त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले नाव सुर्याजी मधुकर दादू माने वय ३६ वर्ष रा. साठेफाटा ता. फलटण जि. सातारा असे सांगीतले त्यावेळी त्यांचे कडील पांढरे रंगाचे पिवशी मध्ये काय आहे असे विचारपूस करता देशी दारू असल्याचे सांगीतले त्यावेळी त्याचेकडे असले पांढरे रंगाचे पिशवी मध्ये मिळून आला प्रोव्हीशन मालाचे वर्णन खालील प्रमाणे, अ.न किंमत वर्णन

 

1) ७२०/- त्यात एक पांढरे रंगाची पिशवी त्यात देशी दारू टॅगो पंच असे लेबल असलेल्या १८० मिलीच्या ९ सिलबंद बाटल्या प्रत्येकी किमंत ८० रूपये प्रमाणे

 

2) ००.००/- अनु १ मधून एक देशी दारू टेंगो पंच ची १८० मिली ची बाटली सी.ए. तपासणी करीता काढून घेतली ती किं. अंदाजे

 

७२०/- येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किमंतीचा प्रोव्हीशन माल पोलीस हवा. २००६ ओंबासे यांनी दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन जप्त करुन त्यास पंचांचे व पोलीसांचे सहह्याची कागदी लेबले लावून जागीच लाखी सिल करुन गुन्हयांचे तपास कामी जप्त केले आहेत.

 

तरी ता. ११/०६/२०२६ रोजी १८.०० वा. चे सुमारास मौजे साठेफाटा ता. फलटण गावचे हद्दीत फलटण ते आसू रोडवर गावचे शेजारी एका झाडाचे आडोशास इसम नामे सुर्याजी मधुकर माने वय ३६ वर्ष रा. साठेफाटा ता. फलटण जि. सातारा याने स्वतः चे झाडाचे आडोशास बेकायदा,बिगरपरवाना स्वतःचे आर्थिक फायदया करीता देशी दारू ची चोरटी विक्री करीत असताना ७२०/-रुपये किंमतीचा प्रोव्हीशन माल आपले कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला आहे. म्हणून माझी सुर्याजी मधुकर माने वय ३६ वर्ष रा. साठेफाटा ता. फलटण जि. सातारा याचेविरुध्द तक्रार आहे.

 

आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, बरड पोलीस दूरक्षेत्रचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस ओंबासे करत आहेत.


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!