फलटण शहरातील विद्यानगरमध्ये घरफोडी! चोर पोलिस खेळ – भाग 1


फलटण शहरातील विद्यानगरमध्ये घरफोडी!

 

चोर पोलिस खेळ – भाग 1

 

फलटण शहर: फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार व फिर्यादीवरून माहिती की,मी सूर्यकांत सखाराम नाळे व्यवसाय एसटी चालक फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन समक्ष जबाब देतो की मी विद्यानगर फलटण सध्याचे ठिकाणी राहण्यास आहे व माझे मुळ गावी विडणी येथे मी शेतीचे कामाकरीता अधुन मधुन जात येत असतो.

 

दिनांक 10/06/2026 रोजी सायं 6.30 वाचे सुमारास मी व माझी पत्नी सुनिता असे आम्ही दोघे विडणी येथे घरी गेलो. त्यानंतर आज रोजी मी शेतात असताना सकाळी 11.30 वाचे सुमारास मला विद्यानगर ता फलटण जि सातारा येथुन धुमाळ मॅडम यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की तुम्ही राहत असले विनायक शंकर ननावरे रा विद्यानगर फलटण यांचे बंगल्यातील तुमच्या रुमचा दरवाजा उघडा असुन तुमचे कपाटाचा दरवाजा देखील उघडा आहे तुम्ही येवुन बघा असे म्हणाल्यावर लगेच विडणी येथुन मी व पत्नी सौ सुनिता असे आम्ही विद्यानगर फलटण येथे आलो व पाहीले असता घराचा दरवाजा उघडा दिसला त्यावेळी आम्ही घरात जावुन पाहीले असता लाकडी कपाटाचे दार देखील उघडे दिसले त्यातील साहीत्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले आम्ही लाकडी कपाटाचा दरवाजा उघडुन लॉकरमधील कप्यातील ठेवलेली एक तोळ्याची सोन्याची चैन व चांदीची जोडवी हे कपाटामध्ये ठेवलेल्या जागी दिसुन आले नाहीत त्यावेळी आम्हाला समजले की आमचे सोन्याचे दागिने चोरी झालेले आहेत. कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे रहाते घरातील एक तोळ्याची सोन्याची चैन व चांदीची जोडवी चोरी केलेबाबत आमची खात्री झाली आहे. तरी आमचे चोरीस गेले सोन्याचे चैनीचे वर्णन खालीलप्रमाणे-

 

1) 48,000/- रु किमतीची एक तोळा वजनाची सोन्याची गोल आकाराची (बॉक्स टाईप आकाराची) चैन जु.वा.कि.अ

 

2) 5,000/- रु किंमतीची चांदीची दोन भार वजनाची जोडवी

 

53,000/-एकुण

 

तरी दिनांक 10/06/2026 रोजीचे सायं 6.30 वा ते दिनांक 11/06/2026 रोजीचे

 

सकाळी 11.30 वाचे दरम्यान विद्यानगर फलटण ता फलटण जि सातारा येथुन वरील वर्णनाचे एकुण 53,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदिचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने माझे रहाते घरातुन चोरुन नेले आहे.

 

अज्ञात चोरटे विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार अमोल रणवरे करीत आहेत.


24
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!