फलटण बसस्थानक बनलेय चोरांचा अड्डा! बसस्थानकावरून दिवसाढवळ्या एकाची दुचाकी चोरीला CCTV चा अभाव की पोलिसांचा खडा पहारा?

फलटण बसस्थानक बनलेय चोरांचा अड्डा!

बसस्थानकावरून दिवसाढवळ्या एकाची दुचाकी चोरीला

CCTV चा अभाव की पोलिसांचा खडा पहारा?

फलटण: फलटण बस स्थानकातून दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.

कृपाल श्रीपाल टाळकुटे रा. रविवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा यांच्या फिर्यादीवरून, व फलटण शहर पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार

समक्ष फलटण शहर पोलीस ठाणेस हजर राहुन देतो खबरी जबाब की, वरील ठिकाणी मी, माझे कुटुंबासह राहणेस आहे. माझे नावावर असलेली सन 2014 साली माझे दैनंदिन कामाकरीता होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक MH 11 BT 9490 ही खरेदी केलेली असुन ती माझे नावे रजिस्टर आहे.

दिनांक 15/02/2026 रोजी दुपारी 11.00 वा. चे सुमारास मी माझे वरील वर्णनाची मोटारसायकल क्रमांक MH 11 BT 9490 ही एस स्टी स्टॅण्ड फलटण येथील पे अॅण्ड पार्क या पार्किंगच्या बाजुस पार्क करुन कामानिमित्त नातेपुते येथे गेलो होतो. व दुपारी 02.00 वा. चे सुमारास पुन्हा परत फलटण एस टी स्टॅण्ड येथे आलो असता मी ज्या ठिकाणी माझी मोटारसायकल पार्क केली होती ती मला मिळुन आली नाही. त्यामुळे मी माझ्या मोटारसायकलचा फलटण शहरामध्ये व आजुबाजुच्या परिसरात आज पर्यंत शोध घेतला परंतु माझी मोटारसायकल मिळुन आली नाही. म्हणून माझी खात्री झाली की, माझी मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. मी माझे मोटारसायकलचा आजपावेतो शोध घेतला असता ती मिळुन न आलेने आज रोजी तक्रार देण्याकरी कृपाल श्रीपाल टाळकुटे रा.रविवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा पोलीस ठाणेस आलो आहे. माझ्या चोरीस गेले मोटारसायकलचे वर्णन खालीलप्रमाणे.

1) 60,000 /- एक लाल काळे रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक MH 11 BT 9490 तिचा चेसीस नं. ME4JC36NKE7122190 असा असुन तिचा इंजिन नं. JC36E73742204असा

60,000/- किंमत

तरी दिनांक 15/02/2026 रोजी दुपारी 11.00 वा. चे ते दुपारी 2.00 वा. चे दरम्यान एस स्टी स्टॅण्ड फलटण येथील पे अॅण्ड पार्क या पार्किंगच्या बाजुस येथे हॅण्डल लॉक करुन लावलेली अंदाजे 60,000 /- रुपये किंमतीची माझे मालकीची एक लाल काळे रंगाची होडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक MH 11 BT 9490 तिचा चेसीस नं. ME4JC36NKE7122190 असा असुन तिचा इंजिन नं. JC36E73742204 असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.

फलटण बस स्थानकातून यापूर्वीही अनेक चोरीच्या घटना घडलेल्या असून बस स्थानक व्यवस्थापन हे घटना गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. यावरती उपाययोजना होणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणे, पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे.

सदर घटनेबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष नाळे करत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!