फलटण मधील सलून मालकास सांगवीतील युवकांकडून लाकडी दांडके व पाईपने मारहाण! युवक गंभीर जखमी, खाजगी दवाखान्यात उपचार सुरू.!


फलटण मधील सलून मालकास सांगवीतील युवकांकडून लाकडी दांडके व पाईपने मारहाण!

युवक गंभीर जखमी, खाजगी दवाखान्यात उपचार सुरू.!

फलटण: फलटण येथील एका सलून मालकास सांगवी येथे गावातील युवकांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

 

 

प्रविण अनिल कर्वे व्यवसाय सलुन, रा. दगडीपुल, बुधवारपेठ, फलटण, ता फलटण, जि सातारा यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून व पोलिस ठाण्यातील माहितीनुसार,

 

समक्ष गॅलक्सी हॉस्पीटल फलटण येथे माझेवर उपचार चालु असताना विचारले वरुन देतो जबाब की, मी वरील ठिकाणचा रहिवासी असुन आमचे रामराजे शॉपिंग सेंटर शिंगणापुर रोड फलटण येथे गाळा क्रमांक 25 मध्ये सलुनचे दुकान आहे.

 

आता आपण मला माझेवर चालु असले उपचाराबाबत विचारले वरुन सांगतो की, माझे सलुनचे दुकानामध्ये सांगवी ता. फलटण येथील राहुल साळुंखे हा कामास होता. तो माझेकडे यापुर्वी 03 वर्षे काम करत असलेने मी त्याचे मजुरीचे कामाव्यतीरीक्त त्याचे आर्थीक मदतीकरीता त्याने मागीतले वेळी पैसे देवुन त्याची आर्थीक अडचन दुर केली होती. त्याने माझे काम 05 महीन्यांपुर्वी न विचारता सोडुन त्याने स्वतःचा व्यवसाय करु लागला.मी त्यास दिलेली उचल रक्कम 10,000/- रु (दहा हजार रुपये) हे वेळोवेळी माझे अर्थिक अडचनिचे वेळी मागीतले त्याचे आईस, तसेच त्याचे काका (मावशीचे पती) यांनाही पैशांबाबत सांगितले होते. त्यांनी पैसे दिले नसलेने मी राहुल साळुंखे (पुर्ण नाव माहीत नाही) यास वारंवार फोन करुन पैसे मागितले. त्यावेळी त्याने सांगवीत ये तुला पैसे देतो असे म्हणाला होता मी दि. 23/03/2026 रोजी दुपारी मी व गणेश यादव रा. उपवळे ता फलटण असे सांगवी मध्ये गेलो दुपारी 03:00 वा चे सुमारास आमचे दोघांचे मध्ये उचलिचे पैशाचे मागणी वरुन बाचाबाची झाली. त्यास मी माझे पैसे मागतोय तुझे नाही असे म्हणालो असता त्याने मला शिवीगाळ करत तुला पैसे देणार नाही असे म्हणत मला लाथाबुक्याने मारहाण करु लागला. आमची भांडणे चालु असताना तेथे येवुन राहुल साळुंखे याचे गाळा मालक गौरव कुंभार, तसेच सलिम शेख, विकी गायकवाड (पुर्ण नाव माहीत नाही) व ईतर एकजन यांनी आमचे गावात येवुन आमचे गावात येवुन आमचे पोरान मारतोय काय असे म्हणत मला खाली पाडुन लाथाबुक्याने मारहाण केली .माझे तोंडावर गौरव कुंभार याने हाताची फाईट माझे ओठावर मारली व शिवीगाळ केली व लाथा मारु लागला त्यावेळी सलीम शेख याचे वडील तेथीलच जळनातील दांडके घेवुन येवुन आमचे पोरास मारतोय काय असे म्हणत दांडके माझे उजवे बरकडीवर मारले व गौरव याने तेथीलच कामाची पाईप माझे डोकीस मारली माझे तोंडातुन रक्त आलेने मी व गणेश यादव असे आमचे मोटर सायकलवरुन फलटणला निघालो त्यावेळी त्यांनी पुन्हा सांगवीत आला तर जिवे मारील अशी धमकी दिली झाले भांडणाबाबत मी भाऊ रोहीत कर्वे यास सांगितले. भाऊ रोहीत कर्वे, भाचा समर्थ पवार, प्रतिक गायकवाड असे सांगवीकडे येत असताना आमची सोमंथली स्टॅन्डवर भेट झाली. आम्ही सर्वजन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत तक्रार देण्यासाठी आलो पोलीसांनी मला सरकारी दवाखान्यात जाण्याचे पत्र दिले मी सरकारी दवाखान्यात गेलो तेथील डॉक्टरांनी माझेवर प्राथमिक उपचार करुन दाताचे उपचाराकरीता व डोकीत मार लागल्याने रेफर केले.मी निकम हॉस्पीटल मध्ये जावुन दाताचे व ओठाचे मध्ये झाले जखमेवर टाके टाकूण उपचार करुन पुढील उपचाराकरीता गॅलक्सी हॉस्पीटल येथे उपचार घेत आहे. सध्या माझेवर उपचार चालु आहेत. मी उपचारास दाखल असलेबाबत येथील डॉक्टरांनी पोलीस ठाणेत कळविले असलेचे मला सांगितले आहे.

 

तरी दि.23/03/2026 रोजी दुपारी 03:00 वा चे सुमारास मौजे सांगवी ता फलटण गावी ग्रामपंचायत कार्यालयाचे जवळ मी दिलेली उचल रक्कम रुपये 10,000/- रु (दहा हजार रुपये) माझा कामगार राहुल साळुंखे यास मागीतल्याचे कारणावरुन 1) राहुल साळुंखे2) गौरव कुंभार 3) विकी गायकवाड 4) सलिम शेख 5) सलिम शेख याचे वडील व इतर एकजन सर्व रा .सांगवी ता. फलटण यांनी मला हाताने ,लाथाबुक्यांनी तोंडावर तसेच दांडक्याने पाठीत, पायावर, उजवे बरकडीवर, पाईपने डोकीस मारुन जखमी करुन शिवीगाळ दमदाटी करुन मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

 

सदर घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार प्रदीप खरात हे करीत आहेत.


संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!