फलटण वनविभागाकडून 1 ते 7 ऑक्टोंबर “वन्यजीव सप्ताह”विविध उपक्रमाने साजरा!
फलटण:वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभाग सातारा अंतर्गत वनपरिक्षेत्र फलटण यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले..
1.यामध्ये प्रामुख्याने लोकसहभागातून वनक्षेत्रात बंधारे घालण्यात आले.
2.तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयात वन्यप्राणी, पर्यावरण तसेच मानव बिबट संघर्ष याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
3.विविध शाळा महाविद्यालयात तालुकास्तरीय निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामधून तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रशस्तीपत्र तसेच बक्षीस ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्याविषयी माहिती तसेच जनजागृती करणे हा हेतू ठेवून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
4.तसेच वनपरिक्षेत्रात लोकसहभागातून वड स्टंप व रोपांची लागवड करण्यात आली.
5. वनक्षेत्रातील कृत्रिम तसेच नैसर्गिक पाणवठे स्वच्छ करून त्यामध्ये वन्यजीवांसाठी पाणी भरण्यात आले आहे. दुष्काळजन्य परिस्थित वन्यजीवांसाठी पाण्याची सोय वनक्षेत्रात होऊन वन्यजीव वनक्षेत्रातच राहावेत व मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा हा यागील हेतू आहे.
या उपक्रमामध्ये वनक्षेत्र फलटणचे अधिकारी ,कर्मचारी, तसेच विविध सामाजिक संस्था यांचा सहभाग होता.अशी माहिती फलटण वन परिक्षेत्राधिकारी निकिता बोटकर यांनी दिली आहे.









