गुरूवर्य गणपतराव काळुंगे माध्यमिक विद्यालय मोळ-डिस्कळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा!
वडूज: आपण भारताचे नागरिक आहोत या नात्याने भारतातील वन्यजीवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे .
वन्यजीव ही निसर्गाने दिलेली देणगी आहे प्राण्यांवर अत्याचार करु नका तसेच वन्यजीवांची शिकार करू नये जर शिकार केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत शिक्षा होऊ शकते.
वन्यजीवांचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे .असे मत डिस्कळ वनरक्षक रुपाली माने मॅडम यांनी व्यक्त केले.
शासनाच्या वतीने दर वर्षी वन्यजीव सप्ताह हा कार्यक्रम 1 आॅक्टोंबर ते 7 आॅक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर डिस्कळ नियतक्षेत्राच्या वतीने मौजे – मोळ येथील गुरूवर्य गणपतराव काळुंगे माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक विद्यार्थी समवेत वन्यजीव सप्ताह व मानव – वन्यजीव संघर्षाबाबत माहिती देऊन जनजागृती केली.
बिबट्या विषयी माहिती देऊन त्याच्या शरीराची रचना कशी असते. तो आपला भक्ष कसा शोधतो या विषयी मोळ गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना वनरक्षक डिस्कळ माने मॅडम यांनी माहिती दिली यावेळी त्यांनी गावातून नागरिक, शिक्षक व विद्यार्थी समवेत प्रभात फेरी काढण्यात आली
हा कार्यक्रम वडूजचे वनक्षेत्रपाल श्री आडपाटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला









