नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; फलटणमध्ये नसरापूरच्या घटनेचा कडाडून निषेध

नराधमाला फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या; फलटणमध्ये नसरापूरच्या घटनेचा कडाडून निषेध

पुणे-नसरापूर घटनेच्या निषेधार्थ लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जनक्षोभ; ‘शक्ती’ कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी

फलटण । ४ मे २०२६ ।

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका बालिकेवर झालेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेच्या निषेधार्थ फलटणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नाशिक केंद्र, फलटणच्या वतीने आज शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी, “त्या नराधमाला फाशी द्यावी, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावे, आम्ही त्याचा योग्य तो बंदोबस्त करू,” असा संतप्त आणि एकमुखी नारा दिला.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा दाखला दिला. ज्याप्रमाणे महाराजांनी रांजाच्या पाटलाला त्याच्या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा दिली होती, तशीच शिक्षा या नराधमाला देऊन समाजात एक कडक संदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली. समाजातली संवेदनशीलता संपत चालली असून अशा घटना वारंवार घडणे हे दुर्दैवी असल्याचे मत मान्यवरांनी नोंदवले.

अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि आरोपींना तातडीने कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने ‘शक्ती’ कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपीला लवकरात लवकर फाशीच्या खांबावर चढवावे, हीच संपूर्ण फलटणकरांची भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या निषेध सभेला फलटण शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यापारी बांधव, विविध सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळ्या फिती लावून आणि घोषणाबाजी करून या घटनेचा निषेध केला.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!