पिंप्रद येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीमध्ये चोरी. 3 लाख 95 हजार रोख रुपये चोरट्यांकडून लंपास! “गजर माऊलींचा….सोहळा चोरट्यांचा…”भाग- 1 


पिंप्रद येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीमध्ये चोरी.

 

3 लाख 95 हजार रोख रुपये चोरट्यांकडून लंपास!

“गजर माऊलींचा….सोहळा चोरट्यांचा…”भाग- 1

 

फलटण: फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,श्रीहरी तुकाराम बाहेकर वय 25 वर्षे व्यवसाय शिक्षण रा मंठा ता मंठा जि. जालना यांचे जबाबावरून

 

समक्ष फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हजर राहून खबरी जबाब देतो की मी वरील ठिकाणचा राहणार असून मी माझी आई शोभा वडिल तुकाराम आजोबा लक्ष्मण असे एकत्रात राहण्यास आहे. मी गेले सात वर्षापासून माझे वडिल तुकाराम लक्ष्मण बाहेकर हे चालवत असलेल्या दिंडी क्र 185 सोबत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतो. दि. 15.07.2026 रोजी आमची दिंडी लोणंद येथे पालखी तळावर पोहचल्यावर आमचे दिंडीतील 450 सभासद असून यांनी बिसीचे रोख रक्कम माझे वडील तुकाराम लक्ष्मण बाहेकर यांचेकडे जमा केले होते. तशी त्यांना रीतसर पावती देण्यात आली होती.

 

 

 

दि. 17.07.2026 रोजी मी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत वारीमध्ये चालत असताना आमच्या दिंडीचा मुक्काम पिंप्रद ता फलटण गावचे हद्दीत शिंदेवस्ती येथे होता. आमचे दिंडीमधील सर्वजण आम्ही रात्री 10.30 वा चे सुमारास जेवणखाण करून मुक्कामाचे ठिकाणी आराम करत होतो.

 

त्याचवेळी आमचे दिंडीचे विश्वस्त व खजिनदार नायबराव गणपत खरात यांचेकडे जमा केलेल्या रकमेची बॅग दिली होती ती बँग त्याच्याजवळ ठेऊन बँगेची काळजी घेत होते ते आमचे महेंद्रा बोलेरो MH44 T 3773 जवळ असलेल्या मोकळ्या जागेत लघवीला गेले व त्यानंतर लघवीवरून आल्यानंतर त्यांने पाहिले की महेंद्रा बोलेरो MH44 T 3773चा पाठीमागील दरवाजा थोडासा उघडा दिसला असता त्यांनी खात्री करण्यासाठी महेंद्रा बोलेरो MH44 T 3773 चा दरवाजा पुर्णपणे उघडून पाहिला असता त्यांना दिसले की गाडीच्या पाठीमागील व सीटच्या मधील भागात वारकर्यानी ठेवलेल्या बँगा व पैशाची बॅग तेथे दिसून आली नाही म्हणून त्यांनी गाडीशेजारी झोपलेल्या वारकर्याना उठवून सदर प्रकार सांगितला त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून सदर बँगचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता बॅगा मिळून आल्या नाहीत म्हणून आमची खात्री झाली की अज्ञात चोरट्याने बँगा चोरून नेहल्या आहेत. आमच्याकडील चोरी झालेल्या बॅगाचे वर्णन खालीलप्रमाणे-

 

1) नायबराव गणपत खरात यांचेकडील बॅगेतील पैशाचे वर्णन

 

1) 3,95,000/- रु. किं. 500,200,100,50, रु दराच्या चलनी नोटा

 

2) 00.00/- रु. कि. बिसीचे पावती पुस्तक व नोंदवही

 

3)00.00/- रू. कि. कपड्याच्या 4 बॅगा

 

एकूण – 3,95,000 /- रू किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल दि 18.07.2026 रोजी रात्रौ 12.30 वा चे सुमारास मौजे पिंप्रद ता फलटण गावचे हद्दीत शिंदेवस्ती येथे आम्ही मुक्कामाचे ठिकाणी आम्ही सर्वजण झोपलेलो असताना जवळच लावलेल्या महेंद्रा बोलेरो MH44 T 3773 गाडीमधून त्यातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने पैशाची व कपड्‌याच्या बॅगा चोरून नेहल्या आहेत.

 

त्या अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!