जावली गावचे वारकऱ्यांना चोरट्यांनी झोपेत असताना लुटले!
गजर माऊलींचा….सोहळा चोरट्यांचा…. भाग -2
फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहितीनुसार व रामचंद्र मारुती सावंत वय 57 वर्षे व्यवसाय शेती रा दिवड ता माण जि. सातारा यांचे फिर्यादीवरून
समक्ष फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हजर राहून खबरी जबाब देतो की मी वरील ठिकाणचा राहणार असून मी माझ्या पत्नी सावित्रा आम्ही दोघे गावी असे एकत्रात राहण्यास आहे. मी गेले दोन वर्षापासून गावातील मित्र परिवारा सोबत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतो.
दि. 16.07.2026 रोजी मी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत वारीमध्ये चालत असताना आमचा मुक्काम वडजल ता फलटण पिसाळवस्ती येथे होता आम्ही रात्री पिसाळवस्ती येथे आमच्या दिंडीत बाहेर झोपलेलो असताना आम्ही आमची कपडे बाजूला काढून ठेवली होती. मी सकाळी 5.00 वा च्या सुमारास उठलो त्यावेळी मी माझी कपडे बघितली असता त्यामध्ये माझा मोबाईल मला मिळून आला नाही. तेव्हा त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. तेव्हा माझी खात्री झाली की माझा मोबाईल कोणीतरी चोरून नेहला आहे म्हणून मी आजूबाजूला चौकशी करत असताना मला समजले की माझे बरोबर असलेले संभाजी रामचंद्र पडर रा.जावली विठ्ठल बाबा गोफणे रा.जावली ता फलटण जि.सातारा व गजानन रामचंद्र कदम रा वारुगड ता माण जि सातारा याचेसुद्धा शेजारी ठेवलेल्या कपड्यामधून पैसे, सोन्याचा बदाम व घड्याळ याची चोरी झाली आहे. आमच्याकडील चोरी झालेल्या वस्तूचे वर्णन खालीलप्रमाणे-
1) रामचंद्र मारुती सावंत यांचेकडील-
1) 10,000/- रु किं ओपो कंपनीचा F 27 मोबाईल त्याचा IMEI नं 865106075129675 /865106075129667 त्याच्यामध्ये BSNL कंपनीचे 9967272220 चे सिमकार्ड असलेला जु.वा.कि.अ.
2) 4,000/- रोख रक्कम
3) 2000 /- रु किमतीचे टायटन कंपनीचे घड्याळ जु.वा.कि.अ.
2) संभाजी रामचंद्र पडर यांचेकडील
1) 1,500/- रु रोख रक्कम
3) विठ्ठल बाबा गोफणे यांचेकडील
1) 5,000/- रू किं । ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम जु.वा.कि.अं.
4) गजानन रामचंद्र कदम यांचेकडील-
1) 1,000/- रु रोख रक्कम व घड्याळ
एकूण – 23,500 /- रू किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल दि 17.07.2026 रोजी पहाटे 5.00 वा चे सुमारास मौजे वडजल ता फलटण गावचे हद्दीत पिसाळवस्ती येथे आम्ही दिंडीच्या बाहेर आमची कपडे बाजूला करून झोपलेलो असताना त्यातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेहला आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस हवालदार अमोल पवार करत आहेत.









