फलटण ग्रामीण पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी! 12 लाख 80 हजार किमतीचे हरवलेले एकूण 71 मोबाईल शोधून देण्यात मिळवले यश! नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन व कौतुक!


फलटण ग्रामीण पोलीसांची उल्लेखनीय कामगीरी! 12 लाख 80 हजार किमतीचे हरवलेले एकूण 71 मोबाईल शोधून देण्यात मिळवले यश!

नागरिकांकडून पोलिसांचे अभिनंदन व कौतुक!1

 

फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हददी मध्ये हाळ तसेच हरविलेले फोन बाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मा. पोलीस अधीक्षक साो सातारा यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाणे यांना सि.ई.आय.आर पोर्टल दवारे मोबाईल शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.

 

सर्व तक्रारीच्या अनुशंगाने सर्व तक्रारी हया सि.ई.आय. आर पोर्टल मध्ये अपलोड करण्यात आल्या होत्या तरी तांत्रीक विष्लेशनादवारे सदर मोबाईल कोणत्या ठिकाणी व कोणत्या सिमकार्डवर सुरु आहेत. याची माहीती घेण्यात आली तापासात निष्पण झाले की बरेच फोन सातारा जिल्हयाबाहेर व परराज्यात जसे कर्नाटक मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या ठिकाणी वापरले जात होते. संबंधीत मोबाईल वारपरकर्त्याना फोनवरुन संपर्क साधुन त्यांना कायदेशीर बाबी समजावुन सांगुन त्यांच्याकडुन मोबाईल परत घेण्यात आले. काही मोबाईल कुरीयर दवारे तर काही प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले. काही तक्रारदार लांबचे असल्याने पोलीस स्टेशनला न येता त्याचे मोबाईल कुरीयरदवारे पाठविण्याची सोय करण्यात आलेली आहे. माहे सप्टेंबर सन २०२६ पर्यंत एकुन ७१ मोबाईल त्यची अंदाजे बाजारात किंमत १२,८००००/- रु आहे. ते सर्व हस्तगत करण्यात ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे.

 

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, वैशाली कडुकर मा. पोलीस अधीक्षक, मा. सो, धन्यकुमार गोडसे साो पोलीस उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनवळ सहा, पोलीस निरीक्षक डी. बी. पथकाचे पो.उप.नि दिपक पवार, सि.ई.आय.आर. पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी श्रीनाथ कदम, तसेच पो.हवा. नितिन चतुरे, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी ही कामगिरी केलेली आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!