जिल्हा नियोजन समिती फंडातील टाकळवाडे ते फुले वस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गावात सत्ता नसताना ही लाखो रुपयांची विकास कामे करण्यात यशस्वी- नानासो (पिंटू) इवरे ,शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष

जिल्हा नियोजन समिती फंडातील टाकळवाडे ते फुलेवस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

गावात सत्ता नसताना ही लाखो रुपयांची विकास कामे करण्यात यशस्वी- नानासो (पिंटू) इवरे ,शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष

फलटण: टाकळवाडे ते फुलेवस्ती रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाश भाउसो मिंड , चेअरमन विकास दादासो इवरे ,सपंत फुले, नानासो फुले,समीर गावडे, धनाजी शिंदे,शहाजी इवरे,अजित मिंड,संतोष नलवडे,सुभाष फुले,दिपक फुले,विलास जाधव,डाॅ.राहुल फुले,दिलीप मिंड,बापुराव खांडेकर,संदीप शिंदे,बाळासो सांगळे ,बाळासो खांडेकर,दशरथ जाधव,सोमनाथ गावडे,प्रशांत गावडे,प्रशांत इवरे,अभिजित इवरे,सतीश पवार निलेश इवरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कामाचा श्रीफळ वाढवुन शुभारंभ करण्यात आला.

फलटण तालुका शिवसेना प्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटु इवरे यांच्या प्रयत्नातुन जिल्हा नियोजन समिती फंडातुन या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असुन लवकरच काम पुर्ण होईल.या अगोदर पण शिवसेनेच्या माध्यमातुन गावात सत्ता नसताना गावातील विकास कामे करुन गावाशी आपली बांधिलकी ठेवत गावातील स्मशान भुमी सुधारणा करणे,फुले वस्ती ,भोकरे डिपी येथे नवीन डि.पी बसवने.२८ फटा, शिंदे वस्ती, येथे लिंकलाईन टाकुन लाईटचा प्रश्न सोडवने, एस.टी बस सेवा सातत्य टिकवुन ठेवने व अभ्यासिका बांधुन गावातील विद्यार्थी यांना सोय उपलब्ध करुन दिली.तसेच अजुन नवीन प्रस्तावित कामे लवकर मंजुर होण्याच्या दिशेने आहेत. सत्ता नसताना गावासाठी कोट्यावधीची लोकउपयोगी कामे करुन गावाच्या विकासात भर टाकली जात आहे.

गावात सत्ता नसताना ही गावात विरोधक म्हणुन नाही तर गावाच्या विकासा बरोबर राहणारे म्हणुन शिवसेना टाकळवाडे गावात काम करत असल्याने गावाला राजकारण पेक्षा गावाच्या विकासाला प्रधान्य दिले गेले.लवकरच राहिलेली कामे  पण मार्गी लावले जातील असे शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष नानासाहेब इवरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!