मा.सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजाळे गावची  विकास कामात गरुडझेप! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतचा सक्रिय सहभाग, तालुकास्तरीय मूल्यमापन समितीकडून कौतुक 


मा.सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजाळे गावची  विकास कामात गरुडझेप!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतचा सक्रिय सहभाग, तालुकास्तरीय मूल्यमापन समितीकडून कौतुक

राजाळे: ता. फलटण येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय मूल्यमापन समितीकडून सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान ग्रामविकासातील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येऊन ग्रामपंचायतीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

 

या पाहणीस पंचायत समिती वैभववाडीचे गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जवाहर नीलमवार, NSRLM चे सुशांत कदम,विस्तार अधिकारी कांता जाधव, सचिन कांबळे, किशोर सपकाळ यांच्यासह त्यांच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले,यांच्या नेतृत्वाखालील  विस्तार अधिकारी ,श्री.सी एम शिंदे ,श्री.बी. बी भोसले ,श्री.विजय निंबाळकर,श्री. संजय काळे विस्तार अधिकारी कृषी,NRLM तालुका समन्वयक श्री नागराज ओमान यांच्या पथकानेही सहभाग घेतला.

 

 

माजी पाणीपुरवठा व्यवस्था,स्वच्छता उपक्रम,रस्ते विकास,शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांची माहिती त्यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामगिरीबद्दल समिती सदस्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. समितीने स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासनिक कामकाज आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची सखोल पाहणी करत ग्रामपंचायतीचे तोंडभरून कौतुक केले.

 

अभियानाच्या यशस्वितेसाठी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, सरपंच मोनाली निंबाळकर , उपसरपंच शरद निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी श्री. आनंद गुरव,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

या पाहणीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक चालना मिळणार असून, आगामी काळात अधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!