राजाळे ते टाकळवाडे रस्त्याचे डांबरीकरण रखडले!डांबर महागले की ठेकेदारांची बिले रखडली!
आगामी रस्त्यावरून ऊस वाहतुकीच्या अगोदर Pwd विभागाकडून रस्त्याचे काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी!
फलटण: फलटण तालुक्यातील राजाळे ते टाकळवाडे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम PWD विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.
परंतु 6 महिने होऊन ही सदर रस्त्यावर डांबर पडले नाही. सदर असता उचकटला असता विभागाने पुन्हा रोलिंग केले परंतु डांबर टाकले नाही. डांबर महागले आहे म्हणून की ठेकेदारांची बिले रखडले आहेत या कारणामुळे काम थांबले आहे हे समजत नाही.
रस्त्यावरून काही दिवसात साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होताना ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या अगोदर रस्त्यावर डांबर टाकून काम पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. अशी व्यथा मागणी ग्रामस्थ व ऊस वाहतूकदाराने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. तरी संबंधित विभागाने आता तरी डोळे उघडे करून काम सुरू करावे.









