टाकळवाडे सोसायटीच्या 2 विद्यमान संचालकांचे बंड; संचालक पदाचा राजीनामा! शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू इवरे यांच्या गटाला धक्का!आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम होणार?


टाकळवाडे सोसायटीच्या 2 विद्यमान संचालकांचे बंड; संचालक पदाचा राजीनामा!

 

शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू इवरे यांच्या गटाला धक्का!आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर परिणाम होणार?

 

 

फलटण: टाकळवाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 2 विद्यमान संचालक, माजी चेअरमन पोपट मारुती मिंड सर,विकास कांतीलाल मिंड यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सहाय्यक निबंधक फलटण व सोसायटी चेअरमन यांच्याकडे दिला आहे. कदाचित गावच्या सोसायटीच्या इतिहासातील हे पहिलेच बंड असावे!

 

 

या 2 संचालकांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना फलटण तालुका प्रमुख पिंटू इवरे यांच्या गटाला धक्का मानला जात आहे.

यामुळे आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर काय परिणाम होतील हे पाहणे उत्सुकता ठरणार आहे.

 

निश्चितच या दोन संचालकांनी केलेलं बंड हे पिंटू इवरे कशा प्रकारे रोखणार? 2 संचालकांच्या पाठीमागे असणारा मतदार हा दुरावला असल्याचे चित्र दिसत असून दुरावलेल्या या मतांची गोळाबेरीज करण्यासाठी पिंटू इवरे कोणते राजकीय डावपेच आखणार? हे पाहावे लागणार आहे.

तोपर्यंत क्रमशः


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!