राजाळे येथे मोठी चोरी
सोन्याचे दागिने,गाडी रोख रक्कम चोरीला.
फलटण: फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मिळालेल्या माहितीनुसार व पुष्पा विठ्ठल जाधव रा.जाधववस्ती जयवंतनगर राजाळे ता.फलटण यांच्या फिर्यादीवर
दिनांक २०/०६/२०२६ रोजीचे पहाटे ०४.३० वा सुमारास
मौजे राजाळे गावचे हद्दित जाधववस्ती जयवंतनगर येथे घरामध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोण्याचे दागिने व घराबाहेर लावलेली टू व्हिलर गाडी असे कोणीतरी अज्ञात चोरटयाने पराचे दार बंद असताना कडी उघडून घरात प्रवेश करुन फिर्यादीचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरुन नेहले आहे.
तपशील खालीलप्रमाणे..
१) ७०,०००/- रु रोख रक्कम त्यात ५००,२००,१०० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा
२) ६०,०००/-रु किंमतीचे दीड तोळे वजणाचे गंठण जुवा कि अं.
(३) ४८,१०२/-रु. किंमतीचे १५.४६० ग्रॅम वजणाचे चैन किंमत पावती प्रमाणे
तसेच माझे पुतणे उमेश बाळासो जाधव यांच्या कडे असलेली टू व्हिलर गाडी व दागिण्यांचे वर्णन
खालीलप्रमाणे
१) ६६,१३०/ एक काळे रंगाची लाल पटे असलेली एच.एफ. डिलयम दु व्हिलर आरटीओ रजिस्टेशन न झालेली एक्स शोरूम किंमत.
(२) २९,०००/- रु. किंमतीचे ग्रॅम वजणाचे कानातील फुले व डोरले
अज्ञात चोरट्याविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.









