फलटण संजय गांधी निराधार योजना शाखेचा भार एका टेम्पररी कर्मचाऱ्यावर ! एका महिला कर्मचाऱ्याचा संजय गांधी शाखेतून पगार आणि गौण खनिज टेबलचा चालवतात कारभार! प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रशासनाच्या असंवेदनशील वागणुकी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

फलटण संजय गांधी निराधार योजना शाखेचा भार एका टेम्पररी कर्मचाऱ्यावर !

एका महिला कर्मचाऱ्याचा संजय गांधी शाखेतून पगार आणि गौण खनिज टेबलचा चालवतात कारभार!

प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रशासनाच्या असंवेदनशील वागणुकी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा

फलटण:

संजय गांधी निराधार योजनेचा फायदा हा विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती यांना होत असतो. परंतु या ठिकाणी एका टेम्पररी महिलेवर हा विभाग चालवला जात आहे. या ठिकाणी शासनाचे चार कर्मचारी असणे अपेक्षित आहे. या  संजय गांधी शाखेमध्ये रीतसर पदमान्यता असताना एक महिला कर्मचारी या गौण खनिज टेबल वरती काम करत असतात. हे गोड बंगाल काय आहे. या प्रकरणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने  नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,

उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करतो की, फलटण तालुक्यातील दिव्यांग शेतकरी व शेतमजूर बांधवांचे अनेक प्रश्न मागील ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

१. फलटण तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागामध्ये पूर्ण वेळ अधिकारी नेमण्यात यावा.

२. दिव्यांग बांधवांचे जागेसंबंधी प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावेत.

३. संजय गांधी विभागात नियुक्त असलेल्या श्रीमती माने मॅडम या नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने त्यांच्या विरोधात कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

४. मे २०२५ मधील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, ते तात्काळ वितरित करण्यात यावे.

५. दिव्यांग बांधवांचे मूलभूत प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहतात. उदाहरणार्थ, मौजे सोमंथळी येथील श्री. शिवाजी कर्चे यांच्या रस्त्याची नोंद तहसीलदार साहेबांनी आदेश देऊनही अद्याप करण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून प्रश्न मार्गी लावण्यात यावा.

वरील सर्व मागण्यांवर आपण दहा दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही दिव्यांग बांधव आमरण उपोषणास बसणार आहोत, याची कृपया गंभीर नोंद घ्यावी. आपण यावर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.

निवेदनावर सागर गावडे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, महेश जगताप अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, संग्राम इंगळे उपाध्यक्ष, अभिषेक गुंजवटे संघटक यांच्या सह्या आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!