श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यात ६१ हजार वृक्षलागवड व संवर्धनाचा संकल्प : उपक्रमशील जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचा उपक्रम!  पहिल्या टप्प्यात बरड जिल्हा परिषद गटात वृक्षांचे वाटप; गटातील प्रत्येक शाळेतून वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस देणार!


श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्यात ६१ हजार वृक्षलागवड व संवर्धनाचा संकल्प : उपक्रमशील जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचा उपक्रम!

 

पहिल्या टप्प्यात बरड जिल्हा परिषद गटात वृक्षांचे वाटप; गटातील प्रत्येक शाळेतून वृक्ष संवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस देणार!

 

 

फलटण दि. ९ : वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि निसर्गाचा बिघडता समतोल यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हीच काळाची खरी गरज असल्याच्या सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवेतून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण फलटण तालुक्यात ६१ हजार वृक्षलागवड व संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असून वाढदिवस शुभेच्छांना पर्यावरण संवर्धनाच्या विधायक कृतीची जोड देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

फलटण तालुक्यातील अनेक गावात पाणी व चारा टंचाई निर्माण झाल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. बदलते हवामान, वाढते उन्हाचे चटके आणि घटत चाललेली हरित संपदा यांचा विचार करता वृक्षलागवड व संवर्धन चळवळ स्वरुपात पुढे नेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांनी आपल्या बरड जिल्हा परिषद गटातून या चळवळीला सुरुवात केली आहे. वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिक कार्यक्रम न करता निसर्गाच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

*बरड गटात 15 हजार वृक्ष रोपांचे वाटप*

या हरित अभियानाची सुरुवात प्रत्यक्ष कृतीतून करण्यात आली असून, बरड जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत सुमारे 15 हजार वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले आहे. वृक्षलागवड चळवळ लोकसहभागातून व्यापक करण्याबरोबरच प्रत्येक रोपाचे संगोपन, नियमित पाणी पुरवठाl आणि संरक्षण यांचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले जात आहे.

झाड लावणे ही केवळ सुरुवात असून, ते झाड मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेणे हीच पर्यावरणाप्रती खरी बांधिलकी आहे, त्यामुळे वृक्षवाटपापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता वृक्षसंवर्धनाची लोकचळवळ उभी करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिक, ग्रामस्थ, युवक आणि विविध सामाजिक संस्थांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या परिसरात वृक्षलागवड करण्याचे आवाहनही या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

*वाढदिवस ते हरित संकल्प : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास*

आगामी वर्षभरात वृक्षरोपवाटप, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या माध्यमातून संपूर्ण फलटण तालुक्यात हरित चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील गावागावांत वृक्षलागवडीला चालना मिळाल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास, जमिनीतील ओलावा टिकविण्यास आणि भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक चांगले नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यास मदत होऊ शकते. अर्थात, वृक्षलागवड व त्यासोबत जलसंधारण, पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि स्थानिक हवामानाला अनुकूल वृक्षांची निवड यांनाही महत्त्व देणे आवश्यक आहे. एक रोप लावा, त्याचे झाड होईपर्यंत जतन करा हा विचार प्रत्येक नागरिकाने कृतीत आणल्यास ६१ हजार वृक्षांचा संकल्प पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक चळवळीत रुपांतरित होऊ शकतो. वाढदिवसाच्या निमित्ताने सुरु झालेला हा उपक्रम लोकसहभागातून फलटण तालुक्याला अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाची संकल्पना आणि अंमलबजावणीसाठी बरड जिल्हा परिषद गट सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था निंबळकचे चेअरमन मेघराज नाईक निंबाळकर, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्या सौ. विजयाताई सोनवलकर, सौ. स्वाती आटोळे, पंचायत समिती सदस्य,

मुंजवडी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन वाघमोडे ,शिक्षक स्टाफ मुख्याध्यापक बापूराव बोडरे सर कमलाकर ठणके सर राहुल सस्ते सर निलेश कराळे सर संदीप ठणके सर शुभांगी भुजबळ मॅडम प्रेमा कदम मॅडम रूपाली खैरे मॅडम गौरी बोंद्रे मॅडमयांच्यासह अन्य मान्यवर आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

वाढदिवस साजरा करण्याची पर्यावरणपूरक संकल्पना समाजासमोर ठेवत, वृक्षलागवडीतून वृक्षसंवर्धनाकडे आणि वैयक्तिक सहभागातून सामूहिक हरित चळवळीकडे वाटचाल करण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!