जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळकचा विद्यार्थी गुरु सुमित कुंभारची पाच मिनिटांच्या सलग व्यायाम कामगिरीची जागतिक विक्रमात नोंद

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा निंबळकचा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी गुरु सुमित कुंभार यांनी पाच मिनिटे न थांबता विविध व्यायामप्रकार सादर करून उल्लेखनीय शारीरिक क्षमता, सहनशक्ती, ताकद आणि जिद्द दाखवून दिली. त्यांच्या या कामगिरीची ‘एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड् प्रमाणपत्राद्वारे दखल घेतली आहे.

गुरु सुमित कुंभार यांनी पाच मिनिटांच्या अखंड व्यायाम सादरीकरणात हाताची हालचाली ६८०, पायांच्या हालचाली ६७३, हिल क्लाइंब ९८, साइड सिट-अप्स ६२, धावण्याच्या सहा फेऱ्या पायाच्या स्टेप ५५१ पूर्ण केल्या. अवघ्या पाच मिनिटांत सातत्यपूर्ण वेगाने ही कामगिरी करत त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, दम सहन करण्याची क्षमता, शिस्त आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’कडून प्रमाणपत्र देण्यात आले असून ९ ऑगस्ट २०२६ रोजी हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

गुरु सुमित कुंभार यांना या कामगिरीसाठी प्रशिक्षक अजित कर्णे आणि सोमनाथ कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.निंबळक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या शिंदे मॅडम यांचे अजित कर्णे सर यांना मार्गदर्शन लाभले तसेच राज इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष रामसाहेब निंबाळकर यांचे सहकार्य मिळाले.

कठोर सराव, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शारीरिक तंदुरुस्ती बाबतची बांधिलकी यामुळे गुरु सुमित कुंभार यांनी ही कामगिरी साध्य केली. त्यांच्या या यशामुळे फालटण तसेच सातारा जिल्ह्याच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल ,क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक  आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर;परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच? मंजूर यादीत गावटग्यांकडून निकष धाब्यावर बसवून धनदांडग्यांना घरकुलांची खिरापत वाटप! तालुक्यातील ग्रामसेवकांकडून चोरांना वजी उचलून देण्याची संशयास्पद भूमिका? “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-2

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

30
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

हर घर तिरंगा अभियान अंतर्गत १४ ऑगस्ट रोजी फलटण पंचायत समिती येथे झेंडावंदनाचा मान कष्टकरी हातांना !”  फलटण पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांचा अनोखा निर्णय;सफाई कर्मचारी व शिपायांच्या हस्ते झेंडावंदन!

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर;परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच? मंजूर यादीत गावटग्यांकडून निकष धाब्यावर बसवून धनदांडग्यांना घरकुलांची खिरापत वाटप! तालुक्यातील ग्रामसेवकांकडून चोरांना वजी उचलून देण्याची संशयास्पद भूमिका? “घरकुल लुटणारे गाव टगे”: भाग-2

फलटण तालुक्यात 8,900 घरकुले मंजूर; परंतु खरे लाभार्थी अजूनही वंचितच! यादीमध्ये ग्रामीण भागात सरपंच,सदस्य,ग्रामपंचायतचे कर्मचारी,धनदांडगे लोक लाभार्थी; बीडीओ अक्षय घावटे लक्ष घालणार का? “घरकुल लुटणारे गावटगे”: भाग-1 

error: Content is protected !!